स्पर्श तुझा कितीक अलगद ,कळीपरी फुलाच्या
आकृती तुझी सदृष्य पापण्याही मिटता डोळ्यांच्या
जाता दूर दूर तू, नाही दूर होत गोड सुगंध
सदैव जसा फुलात असतो प्रेमाचा मकरंद
पावसाळी सर तू,भिजवतेस अंग चिंब चिंब
ओंजळीत झेलता थेंब फक्त तुझेच प्रतिबिंब
अल्लद पडताच दव फुलतात कळ्या मनाच्या
स्पर्श तुझा कितीक अलगद ,कळीपरी फुलाच्या
ओझरत पाणी चेहऱ्यावरून ,साचत मनात
प्रीतीची बाग मी हृदयी फुलवतो अनवरत
गवाक्षाला एकेक ओघळणाऱ्या थेंबाचीही वाट
बरसणाऱ्या तुझ्या ओल्या स्पर्शाने झालीया पहाट
भिजवून चिंब टिपणाऱ्या छेडती सरी प्रीतीच्या

0 comments:
Post a Comment