Sunday, October 14, 2012

"कुसुमाग्रज" कवितांच्या दुनियेतले दैवत
कुसुमाग्रज

वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यु इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातुन पास झाले.
kusumagraj

१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धर्नुधारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.

१९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भूरळ घालते. 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कांदबरी व 'दूरचे दिवे' हे प्रसिध्द झाले.

'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले.

कुसुमाग्रज एक आगंळ व्यक्तिमत्व 
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळीचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.

साहित्यसूर्य मावळला 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दु:ख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरच प्रभुत्व यामुळेच 'नटसम्राट' व 'विशाखा' सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे. अशा ह्या देवस्वरूप व्यक्तिमत्वाला आमचे कोटी कोटी प्रणाम.
जीवनपट
वर्षवाटचाल

२७ फेब्रुवारी १९१२

पुणे येथे जन्म
नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर
दत्तक विधान व नामांतर - विष्णु वामन शिरवाडकर
१९१९ - २४
प्राथमिक शिक्षण - पिंपळगांव बसवंत
१९२४- २९
माध्यमिक शिक्षण - नाशिक येथील न्यु इंग्लिश स्कूल
(आत्ताची जु. स. रुंगठा हायस्कूल, नाशिक)
१९२९
बालबोधमेवा (संपादक - दे. ना. टिळक) मध्ये लेखन व कविता
मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ
१९३०
हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व 'रत्नाकर' मासिकात कवितांना प्रसिध्दी
१९३२
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
१९३३ धृव मंडळाची स्थापना, 'नवा मनू' मध्ये वृत्तपत्रीय लेखन, 
'जीवन लहरी' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
१९३४
बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (मराठी - इंग्रजी)
१९३६-१९३८गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश,
'सती सुलोचना' कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
१९३८- १९४६ वृत्तपत्र व्यवसाय, साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी. 
विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
१९४४विवाह. पत्नीचे नाव मनोरमा ( माहेरचे नाव गंगुबाई सोनवणी )
१९४६'वैष्णव' पहिली कांदबरी. 'दूरचे दिवे' पहिले नाटक
१९४६-१९४८साप्ताहिक 'स्वदेश' संपादन
१९५०लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
१९५६अध्यक्षपद मुंबई उपनगर साहित्य (मालाड)
१९५९संयुक्त्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रह
१९६०मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ६२ व्या वार्षिक उत्सवाचे अध्यक्षपद
१९६०राज्य पुरस्कार 'मराठी माती' (काव्यसंग्रह)
१९६२राज्य पुरस्कार 'स्वगत' (काव्यसंग्रह)
१९६४राज्य पुरस्कार 'हिमरेषा' (काव्यसंग्रह)
१९६४अध्यक्षपद, ४५ वे मडगाव (गोवा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
१९६४'जीवनगंगा' नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
१९६६राज्य पुरस्कार 'ययाति आणि देवयानी' या नाटकास
१९६७राज्य पुरस्कार 'वीज म्हणाली धरतीला' नाटकास
१९६४-१९६७पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
१९७०अध्यक्षपद, मराठी नाटय संमेलन, कोल्हापूर
१९७१राज्य पुरस्कार 'नटससम्राट' नाटकास
१९६२-१९७२अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
१९७२सौ. मनोरमाबाईंचे निधन
१९७४'नटसम्राट' नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार (ताम्रपट व पाच हजार रूपये)
१९८५अखिल भारतीय नाटयपरिषदेचा राम-गणेश गडकरी पुरस्कार
१९८६डि. लिट् पुणे विद्यापीठ
१९८७अमृत महोत्सव
१९८८संगीत नाटयलेखन अकादमी पुरस्कार
१९८८ज्ञानपीठ पुरस्कार
१९८९अध्यक्ष, जागतिक मराठी परिषद, मुंबई
१९९१पद्मभूषण
१९९६कुसुमाग्रज तारा
१० मार्च १९९९कुसुमाग्रजांचे निधन
२००३पोष्टाचे तिकीट प्रकाशन
साहित्य सुची 

नांव वर्षआवृत्ती वर्ष
जीवनलहरी १९३३तिसरी आवृत्ती १९७७
जाईचा कुंज, बालांसाठी कविता १९३६
विशाखा १९४२अकरावी आवृत्ती १९८५
समिधा १९४७दुसरी आवृत्ती १९७९
किनारा १९५२तिसरी आवृत्ती १९७६
मेघदूत अनुवाद १९५६
मराठी माती १९६०
स्वगत १९६२दुसरी आवृत्ती १९८६
हिमरेषा १९६४
वादळवेल १९६९
रसयात्रा १९६९संपादक - बा.भ. बोरकर
व शंकर वैद्य. तिसरी आवृत्ती
१९८९
छंदोमयी १९८२
मुक्तायन १९८४
श्रावण १९८५
प्रवासी पक्षी १९८९संपादक - शंकर वैद्य
पाथेय १९८९
बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज १९८९
माधवी १९९४
महावृक्ष १९९७
करार एका तार्‍याशी १९९७संपादक - वसंत पाटील
चाफा १९९८
मारवा १९९९
अक्षरबाग १९९९
थांब सहेली २००२

कविता संपादने
काव्यवाहिनी - खंड १ ते ४
१९५१रा. श्री. जोग यांच्या सहकार्याने  
साहित्यसुवर्ण १९६१ वा. रा.ढवळे व वामन चोरघडे यांच्या सहकार्याने
फुलराणी१९६८ तिसरी आवृत्ती१९७१
पिंपळपान१९७०
चांदणवेल१९७२ गो. म. कुलकर्णी यांच्या सहकार्याने
१०० कविता१९९१
सुवर्ण कोश१९९४

कादंबर्‍या
वैष्णव १९४६चौथी आवृत्ती १९६२
जान्हवी १९५२दुसरी आवृत्ती १९८२
कल्पनेच्या तीरावर १९५६दुसरी आवृत्ती १९८२

कथासंग्रह
जादूची होडी १९४६बालकथा
फुलवाली १९५०दुसरी आवृत्ती १९८२
छोटे आणि मोठे मासे १९५३
आहे आणि नाही १९५७दुसरी आवृत्ती १९८१
सतारीचे बोल आणि इतर कथा १९५८दुसरी आवृत्ती १९८१
काही वृध्द आणि काही तरूण १९६१
प्रेम आणि मांजर १९६४
कुसुमाग्रजांच्या बारा कथा १९६८दुसरी आवृत्ती १९८२
अपाँईटमेंट १९६८मुक्त गद्य ललित निबंध
विराम चिन्हे १९७०
वाटेवरच्या सावल्या १९७३दुसरी आवृत्ती १९८१
प्रतिसाद १९७६
एकाकी तारा १९८३
शेक्सपीअरच्या शोधात १९८३
रूपरेषा १९८४संपादन - सुभाष सोनवणे
अंतराळ १९९१

श्री. वि. वा शिरवाडकर यांच्या साहित्यावरील विद्यापीठ प्रबंध
शिरवाडकरांच्या साहित्याचा समीक्षात्मक विचार डॉ. द. दि. पुंडे, पुणे
वि. वा. शिरवाडकर एक चिकित्सक अभ्यास डॉ. तारा सांगवीकर, नागपूर
वि. वा. शिरवाडकरांच्या समग्र वाड्.मयकृतीचा अभ्यास डॉ. रा.ग.हिरेमठ, शिवाजी विद्यापीठ
वि. वा. शिरवाडकर यांच्या नाटकातील व्यक्तिचित्रे सारिका ठोसर, जबलपूर

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या वाडृ.मयावरील ग्रंथ
नटसम्राट आणि किंग लिअर १९७२मो. द. ब्रम्हे
कुसुमाग्रज: साहित्य समीक्षा १९७६संपादक. ग. वि. अकोलकर व बा.वा. दातार
शिरवाडकरांची नाटके १९८१शोभना देशमुख
नटसम्राट समीक्षा १९८५संपादक. गो.तु.पाटील
कविता कुसुमाग्रजांची १९८७अक्षयकुमार काळे
गर्जा जयजयकार! एक जागरण १९८७संपादक. उषा. मा. देशमुख
कवितारती (खंड १ व २) १९८७संपादक. पुरूषोत्तम पाटील
कुसुमाग्रज - साहित्यदर्शन १९८९उषा. मा. देशमुख
निवडक कथा १९९३संपादक. शांता शेळके
अग्रपूजा२००० अग्रलेख - शं. ना. अंधृटकर

त्रिदल - द. दि. पुंडे / स्नेहल तावरे

कथा-कीकरका पेड - विद्या चिटको (हिंदी)
हरा मफलर और कहानियाँ - विद्या चिटको (हिंदी)
कल्पनाके कगारपर - विद्या चिटको (हिंदी)
समीधा - विद्या चिटको (हिंदी)
काव्य कलश का स्वर्ण कलश - विद्या चिटको (हिंदी)
वह यात्रा सुखद रही - विद्या चिटको (हिंदी)
कुसुमाग्रज एक साहित्यिक विचार - (हिंदी) अलीगड विद्यापीठ
कुसुमाग्रज की चुनी सुनी नज्मे - गुलजार (हिंदी)
Blooms of the earth - (कविता) इंग्रजी - डॉ विलास साळुंके
Pelencuin (कविता) इंग्रजी - चंद्रकांत सहस्त्रबुध्दे
Selected Poems of Kusumagraj (कविता) -इंग्रजी - वीरकर
मुंबई विद्यापीठ (हिंदी) -मनोज चोणकर
मुख्यमंत्री (नाटक) - मो.ग. तपस्वी
कथांचे भाषांतर (कन्नड) - शारदा पाटील
छंदोमयी (कविता) हिंदी - मनोज सोनकर
विदूषक नाटक (हिंदी) - प्रशांत पांडे
इसी मिट्टीसे कविता (हिंदी) -चंद्रकांत बांदीवडेकर

नाटके
दुरचे दिवे १९४६चौथी आवृत्ती १९७३
दुसरा पेशवा १९४७पाचवी आवृत्ती १९७९
वैजयंती १९५०दुसरी आवृत्ती १९६०
कौतेंय १९५३आठवी आवृत्ती १९७३
राजमुकूट (मॅक्बेथ) १९५३दुसरी आवृत्ती १९७८
ऑथेल्लो १९६१
आमुचे नांव बाबुराव १९६५
ययाती आणि देवयानी १९६८तिसरी आवृत्ती १९८५
वीज म्हणाली धरतीला १९७०दुसरी आवृत्ती १९८५
बेकेट १९७१
नटसम्राट १९७१पाचवी आवृत्ती १९८७
विदूषक १९७३
एक होती वाघीण १९७४
आनंद १९७५
मुख्यंमंत्री १९७७
चंद्र जिथे उगवत नाही १९८४
महंत १९८६
कैकयी १९८९
किमयागार १९९६सहलेखक - सदाशिव अमरापूरकर

नाटिका आणि एकांकिका
दिवाणी दावा १९५४तिसरी आवत्ती १९७३
देवाचे घर १९५५दुसरी आवृत्ती १९७३
नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका १९६०दुसरी आवत्ती १९७१
संघर्ष - 'सुगंध' दिवाळी अंक १९६८
बेट- 'दिपावली' दिवाळी अंक१९७०

लेखसंग्रह
प्रतिसाद १९८९
मराठीचीए नगरी १९९५
एखादे पान एखादे फुल १९९६
बरे झाले देवा १९९७
पुरस्कार 
कुसुमाग्रज साहित्य व त्यांना मिळालेले पुरस्कार याची लांबच लांब यादी देणं शक्य नाही. पण काही पुरस्कारांचा इथे उल्लेख करावाच लागेल, ज्यामुळे वाङमयातील त्यांचे उत्तुंगत्व वाचकांना कळेल.

१९७४ साली 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला.
'ज्ञानपीठ' पुरस्कार
Click on image for larger view
१९८५ साली अखिल भारतीय परिषदेचा 'राम गणेश गडकरी' पुरस्कार मिळाला.
१९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
१९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला.
'ज्ञानपीठ' पुरस्कार हे त्यातले अतिउच्च शिखर होय. यापूर्वी त्यांचे निकटचे मित्र ख्यातनाम साहित्यिक वि.स. खांडेकर यांना हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले मराठी साहित्यिक व दुसरे कुसुमागुज.

सामाजिक कार्य 
कुसुमाग्रज एक समाज सेवक

कुसुमाग्रज एक समाज सेवककुसुमाग्रजांना गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. आदिवासी लोकांबद्दल जी माया होती ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. ज्यासाठी त्यांनी १ लाख रू. दिले. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रिडा शिबीरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले. या सर्वठिकाणी कुसुमाग्रज वाचनालय उभे करण्यास सहाय्य दिले.

कुसुमाग्रजांनी सुरू केलेले पुरस्कार 
कुसुमाग्रजांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना आंनद तर झाला पण त्यातूनच अशा अनेक साहित्यिकांना गौरवावे ही कल्पना साकारण्यासाठी 'जनस्थान' पुरस्काराचा जन्म झाला. त्याचा दृष्टीकोन फक्त साहित्यापुरताच सिमीत नव्हता तर इतर क्षेत्रातील मान्यवरांबद्दलही आदर होता. हे १९९२ साली त्यांनी सुरू केलेल्या 'गोदावरी पुरस्कारा' वरून दिसून येते. जो क्रिडा, कलानाटय, संगीत, चित्रपट, विज्ञान, चित्रकला, शिल्पकला व साहस अशा विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार असून भारतातील कुठल्याही भागातील योग्य व्यक्तीला तो देण्यात येतो.
अतिशय साधी रहाणी, मानवतेबद्दल कळवळा आणि समाजसेवेची तळमळ यामुळे नाशिकवासीयांना ते ऋषीतुल्य वाटत. अत्यंत नम्र व साध्या वागणुकीमुळे ते सर्वांना आपलेसे वाटतच पण त्यांच्याशी बोलतांना, वागतांना मोकळेपणा वाटे.
कुसुमाग्रज म्हणजे नाशिक व नाशिक म्हणजे कुसुमाग्रज असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कुसुमाग्रज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  http://www.kusumagraj.org यांच्या सौजन्याने 
BEST REGARDS,
Mr. VipinKumar R. Pawar
Anita's MicroSystems(INDIA)
Site: www.anitasmicrosystems.in
Mob: +91-7875899873

Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit, sed diam nonummy nibh euismod tincidunt ut laoreet dolore magna Veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat.

0 comments:

Start Work With Me

Contact Us
VipinKumar R. Pawar
+91-7875899873
India