महाराष्ट्राने आपले गतवैभव पुन्हा मिळालेच पाहिजे

शोभा डे देशातील एक प्रथितयश व सिध्दहस्त लेखिका आहेत. महाराष्ट्रातील घराघरात त्यांचे नाव पोहोचले आहे. त्यांनी एकूण १५ पुस्तकांचे लेखन केले असून, भारतीय ले़खकांच्या यादीत त्यांचे नाव आदराने घेतले जाते. साहित्य क्षेत्रातले अनेक विक्रम त्यांच्या नावि आहेत. 

त्यांचि काहि पुस्तके भारत तसेच विदेशातिल विद्यापिठांच्या साहित्य अभ्यासक्रमात तुलनात्मक अभ्यासक्रमात लावण्यात आली आहेत. तसेच त्यांचे शंभराहुन अधिक प्रभंध जगभरातिल विविध ग्रथांलयामध्ये उपलभ्ध आहेत. 

शोभा डे अनेक देशी तसेच आंतरराष्ट्रिय प्रकाशनांसाठी राजकारण विषयावर लेखन करतात. त्यांच्या पत्रकारतेतील उल्लेखनीय योगदानाबद्द्ल त्यांना अने़क पारीतोषिक प्राप्त आहेत. 

स्पष्ट आणि सडेतोड बोलणा-या शोभा डे आपल्या आगळ्या व निर्भीड शैलीत सद्य भारतीय स्थितिवर टिप्पणी करत असतात. 

मार्च २०१० च्या रिडर्स डायजेस्ट अंकात भारतातील सर्वात विश्वसनीय व्यक्तींमध्ये रतन टाटा व डॉ. अब्दुल कलाम यांच्या जोडीला शोभा डे यांना स्थान देण्यात आले होते. 

लोकमत मिडीया द्वारा २०११ सालावर प्रभाव टाकलेल्या आठ मराठि व्यक्ती निवडण्यासाठी स्थापित, 'लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द ईअर अवॉर्ड २०११' पुरस्काराचे विजेते निवडण्याच्या ज्युरी मंडळावर शोभा डे यांना स्थान देण्यात आले आहे. 

शोभा डे यांनी महाराष्ट्रातील एकंदर घडामोंडीवर व्यक्त केलेले विचार पुढील प्रमाणे आहेत. 

आपण अत्यंत व्यस्त दिनचर्येतुन २०११ सालातिल प्रभावी मराठी व्यक्तीमत्व पुरस्कारांचे विजेते शोधण्यासाठी खुप वेळ दिला, हे आव्हान आपन कसे काय पेलले? 

लोकमत सोबत माझे जिव्हाळ्याचे संबध असुन यंदा त्यांच्या दिवाळि अंकासाठी पाहुणे संपादक म्हणुन मी काम केले आहे. त्यापे़क्षा जास्त मला विविध गटातील आठ प्रभावी मराठी व्यक्तींचि अंतिम यादी तयार करताना पडलेल्या श्रमाचे कौतुक वाटत आहे. विजेते निवडिची संपुर्ण प्रक्रीया अंत्यत पारदर्षक असुन त्यामागे कोणत्याही प्रकारचा छुपा कार्यक्रम नाहि. 

पुरस्कारांसाठी विचारात घेण्यात आलेल्या आठ क्षेत्रांविषयी आम्हाला माहीति द्याल का? 
एकूण आठ विविध गटांसाठी पुरस्कार देण्यात येणार असुन त्यात समाजसेवा व सार्वजनीक सेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राजकारण, व्यवसाय, कला आणि मनोरंजन या क्षेत्रांचा समावेष आहे. प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा समावेश असुन त्यांचे आपपल्या क्षेत्रातिल योगदान सोहळा साज-या करण्यासमान तसेच प्रेरणादायी आहे. मी कला क्षेत्रातील व्यक्ती आहे. माझा नेर्सगीक कल हा कला, वाडमय आणि मनोरंजन या क्षेत्रांकडेच होता. 

आपण तयार केलेल्या ३९ जणांच्या अंतीम यादीत आपल्यावर सर्वाधीक प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण? 
माझ्या स्वताविषयी बोलायचे झाल्यास, मी कोल्हापुरच्या प्रविण गव्हाणकर यांच्या उल्लखनिय कार्याने खुपच प्रभावित झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठि राजु शेट्टि यांनी केलेल्या कामाने देखील मी प्रभावित झाले आहे. 

एक लोकप्रीय व सेलेब्रिटी व्यक्ती या नात्याने उद्याच्या महाराष्ट्रात आपणास कोणत्या सुधारणा आणी बदल अपेक्षीत आहेत. 

महाराष्ट्राचे गतवेभव पुन्हा मीळावे आणी देशात राज्य आघाडिवर राहावे यासाठि आपण झटले पाहीजे. त्यासाठि सर्व राजकारण्यांनी निस्वार्थ बुध्दी आणि एकजुटिने या गतीमाण महाराष्ट् राज्यासाठी कार्य करण्याची गरज आहे. इतर राज्यांशी स्पर्धा करायची असल्यास महाराष्ट्रात उत्तम पायाभुत सुविधा आणी संर्पक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तरच राज्यात गुंतवुणक आकर्षित होइल. राज्याचा विकास करताना गोरगरीबांच कल्याण हेच आपल प्रमुख उद्दीष्ट असल पाहीजे. २१ व्या शतकात देखील राज्यातल्या अनेक खेडी विजेविणा अंधारात आहेत हि आपल्यासाठी नक्कीच शरमेचि बाब आहे. राज्यात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देवुनच सर्व समस्यांना उत्तर मीळेल असे माझे मत आहे.  


BEST REGARDS,
Mr. VipinKumar R. Pawar
Anita's MicroSystems(INDIA)
Site: www.anitasmicrosystems.in
Mob: +91-7875899873

No comments: