स्त्रीभ्रूण हत्या, कश्यासाठी?

आपल्याला या लेखाबद्दल काय वाटते ते comment च्या माध्यमातून जरूर कळवा


     Inline image 3

हे तर खुनीच आहे.

परळी वैजनाथ येथील डॉ. सुदाम मुंडे याने आतापर्यंत चार हजार स्त्रीभ्रूण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.पोलिस कोठडीत असलेल्या सुदाम मुंडेने चौकशीत ही कबुली दिली आहे.स्त्रीभ्रूणहत्या केलेली अर्भकं मुंडे स्वतःच्या शेतामध्ये जाळून नष्ट करायचा. जाळल्यानंतर आजूबाजूला पडलेले अर्भकांचे अवशेष परिसरातील कुत्रे खात असत. पुरावा हाती लागू नये, यासाठी ही खबरदारी घेत असत.सुदाम मुंडेने गेल्या दहा वर्षात किमान ९० हजार मुलींची गर्भातच हत्या केल्या आहेत.सुदाम मुंडे एका दिवसाला किमान २०, महिन्याला ६०० स्त्रीभ्रूण हत्या करायचा असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केला आहे.स्त्रीभ्रूण हत्येच्या या धंद्यात सुदाम मुंडेला आणखी काही डॉक्टरांचा समावेश आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.

हे भंयकर कृत करताना या निर्दयी माणसाना काहीच वाटले नसेल?एक एकेक हत्या करीत करीत ते हत्यारे बनले.या डाँक़्टराना दयेच्या अर्जा शिवाkय फाशीच द्यायला हवी.ही कारवाई तातडीने झाली पाहिजे.यानी डाँक्टरी पदवी ही मनुष्य प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी घेतली कि जीव घेण्यासाठी.मानवाला मारुन पैसे कमविण्यारी माणसे ह्या जगात आहेत.पण ती शिक्षित नसातात.ही डाँक़्टर मडंळी मात्र उच्च शिक्षित आहेत.ह्यानी उच्च शिक्षिण माणसे मारण्यासाठी घेतलेले दिसते.उच्च शिक्षणाचा उपयोग वाईट कामासाठी केला आहे.राजकिय पाठींबा असल्याशिवाय हे धाडस ते करु शकणार नाहीत. 
हे कसले डाँक्टर हे तर कसाईच.असले डाँक़्टर म्हणजे डाँक्टरीपेशाला ह्यामुळे कालीमा फासला आहेत

'स्त्री भ्रूणहत्या' ही आपल्या देशाला लागलेली फार मोठी कीड आहे.स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी समाजजागृतीची गरज आहे.डॉक्टरांनीच गर्भलिंग परीक्षण करणे बंद केल्यास 'स्त्री भ्रूणहत्या' रोखु शकतो.हे प्रकार रोखण्यासाठी डॉक्टरांनीच पुढाकार घेतल्यास वैद्यकीय व्यवसायाला पुन्हा प्रतिष्ठा येईल.

मुलींचा कमी होणारा जन्मदर ही गंभीर बाब असून या सामाजिक समस्येवर जागरूकता निर्माण करण्यासाठी व भ्रूणहत्या रोखण्यासाठी सर्वांनी तळमळीने प्रयत्न करण्याची गरज आहे. 

No comments: