माझी दुसरी नोकरी...............!!!

Shree Sai Precision Instrumentation and Research Centre.
          १९ फेब्रुवारी, माझ्या दुसऱ्या नोकरीचा पहिला दिवस. पहिला दिवस तर चांगला गेला. काही जॉब रिलेटेड डॉक्युमेंट्स वाचायला दिले होते.  सर्व काही प्रक्टिकल होते. त्याच दिवशी समजले कि दुसऱ्या दिवशी पहाटेच ऑन साईट जायचे होते. 
            पहिली व्हिजीट होती "उत्तम फूड प्रा. लि., रांसाई, रायगड.", हि कंपनी ब्रिटानिया बिस्कीट बनवते. तिथे instruments चेक करता करता खूप मजा आली. त्याच बरोबर आम्ही खूप बिस्किटे खाल्ली. कंपनीच्या स्टाफ ने खु सहकार्य केले. तेथे समजले कि आपण किती सुरक्षित अन्न खातो ते.
       नंतर दुसरी व्हिजीट होती "दि.एम. पोलीमार्स, lonaavalaa", येथे खूप काम होते. तिथे आम्हाला ३ दिवस लागले. पण कंपनीने रहाण्याची आणि जेवण्याची सोय कंपनीने चांगली ठेवली. त्यामुळे काही त्रास झाला नाही. तिथल्या स्टाफ बरोबर चर्चा करतांना समजले कि त्या कंपनीमध्ये "अरुण गवळी"यांचे शेयर्स आहे. तेव्हा खूपच आश्चर्य वाटले.
       तिसरी व्हिजीट होती, "शाह बेकर्स, खोपोली ", इथे तर टोस्ट आणि ब्रेड खाऊन जेवायची वेळच आली नाही.
       थोडक्यात नवा जॉब अजून तरी त्रास दायक वाटत नाही. बघू. सध्या ८०००/-  पगार आहे. पुढे चांगले चान्स आहेत.

No comments: